क्रुझिओ

महिंद्रा क्रुझिओ ही अतिशय फायदेशीर, श्रेणीतील सर्वोत्कृष्ट बस आहे जी तुम्हाला नवीन सुविधा, नवीन इंटिरियर देते आणि संपूर्ण नव्या स्टाईलमध्ये आहे. आराम, सुरक्षितता आणि सुविधा या सर्व गोष्टी एकाच बसमध्ये समाविष्ट आहेत.

वैशिष्ट्ये, तपशील, उपयोग आणि यूएसपीजः

तुमच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून तयार करण्यात आली आहेः

महिंद्रा क्रुझिओ ही तिच्या श्रेणीतील एकमेव अशी बस आहे जी पूर्णपणे तक्रारींचे निराकरण करणारी आहे. आगीमुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण होण्याच्या खूप अगोदर तुम्हाला कार्यवाही करता यावी यासाठी फायर डिटेक्शन आणि अलार्म सिस्टीम बसविण्यात आली आहे.

सर्वाधिक आराम, जास्तीत जास्त सुविधाः

महिंद्रा क्रुझिओ ही ड्रायव्हर आणि पवाशांना आराम देण्याच्या दृष्टीकोनातून विचारपूर्वक डिझाइन करण्यात आली आहे. ऐसपैस आसन, भरपूर मोकळे आणि आरामदायी इंटिरिअर, यामुळे प्रवाशांना त्यांच्या आसनांवर नेहमीच आरामशीर वाटते आणि त्यांच्या कार्यस्थळी ते फ्रेश होऊन पोहोचतात.

कामगिरी व सुरक्षितता या प्रमुख वैशिष्ट्यांवर नेहमीच नजर असतेः

iMAXXला आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे पाठबळ देण्यात आले आहे त्यामुळे तुम्हाला दररोज अचूक परिणाम साध्य होतात, मोठी बॅटरी आणि डेटा साठवण्यासाठी मेमरी यांनी सज्ज असल्यामुळे, विश्लेषणात्मक माहिती प्राप्त होते आणि तुमच्या व्यवसायावर देखरेख ठेवण्यासाठी आणि त्यात वाढ करण्यासाठी नियमितपणे अहवाल दिला जातो.

शाळेचा प्रवास आता अधिक सुरक्षितः

क्रुझिओ स्कूल बस मध्ये मुलांच्या सुरक्षितेला प्रथम आणि सर्वाधिक प्राधान्य दिले जाते. व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टीम (VTS), फायर डिटेक्शन अँड सपेशन सिस्टीम (FDSS), चाइल्ड चेक मेट वैशिष्ट्य आणि बसवर लक्ष ठेवण्यासाठी चा वापर यामुळे आरटीओ द्वारा निश्चित करण्यता आलेली सर्व सुरक्षिततेसंबंधी वैशिष्ट्ये समाविष्ट आहेत याची काळजी घेतली जाते.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

महिंद्रा क्रुझिओ बस क्रुझिओ 2750 BS6, क्रुझिओ 3100 BS6, क्रुझिओ 3370 BS6, क्रुझिओ 3800 BS6, यांची इंधन क्षमता 60 लिटर आहे आणि क्रुझिओ 4250 BS6, क्रुझिओ 5310 BS6 यांची इंधन क्षमता 120 लिटर्स आहे.

महिंद्रा क्रुझिओ स्कूल बस क्रुझिओ 2750 BS6, क्रुझिओ 3100 BS6, क्रुझिओ 3370 BS6, क्रुझिओ 3800 BS6 मध्ये एमडीआय 2.5 लीटर BS6 टर्बोचार्ज्ड इंटरकूलर इंजिन आहे आणि क्रुझिओ 4250 BS6, क्रुझिओ 5310 BS6 मध्ये एमडीआय टेक 3.5 लीटर BS6 टर्बोचार्ज्ड इंटरकूलर इंजिन आहे.

क्रुझिओ स्कूल बस BS6 मध्ये सीसीटीव्ही, रिव्हर्स कॅमेरा, जीपीएस ट्रॅकिंग, डबल डोअर पर्याय, खास बनविलेली आसन क्षमता, वाहन ट्रॅकिंग सिस्टम, फायर डिटेक्शन आणि सपेशन सिस्टम, फायर डिटेक्शन आणि अलार्म सिस्टम यासारखी सुरक्षा वैशिष्ट्ये समाविष्ट आहेत.