8

महिंद्रा ट्रक आणि बस विभागाने आपल्या ‘राईज’ तत्त्वज्ञानाला अनुसरून भारतीय ट्रक चालक समुदायावर प्रकाश टाकण्यासाठी सारथी मोहीम सुरू केली आहे. ह्या अनोख्या प्रकल्पांतर्गत केवळ ट्रक चालकांनाच नाही तर त्यांच्या कुटुंबियांनाही देखील सहकार्य केले जाते. सारथी अभियानाचा पहिला टप्पा सुप्रसिद्ध हृदयस्पर्शी शिष्यवृत्ती कार्यक्रमाने सुरू झाला. ही शिष्यवृत्ती ट्रक चालकांच्या मुलींना देण्यात आली. यामध्ये 10वी उत्तीर्ण व पुढील शिक्षण घेणाऱ्या हुशार मुलींना रु.10,000 शिष्यवृत्ती देण्यात आली. हा उपक्रम म्हणजे त्या सर्व ट्रक चालकांना आमचा मानाचा मुजरा आहे, ज्यांनी कठीण प्रसंगांना तोंड देत आपल्या मुलींना शिकविले. ही तर फक्त सुरुवात आहे. सारथी अभियानासोबत हा प्रवास सुरू ठेवून ट्रक चालकांची काळजी घेण्याचा आमचा संकल्प आम्ही पूर्ण करू.

7

अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी. ही एक तत्वप्रणाली आहे जी महिंद्रा अँड महिंद्राला एका नवीन युगात घेऊन जाते. एक असे युग जे भारतीय वाहतुक क्षेत्राला उत्कृष्टतेची नवीन उंची गाठण्यास मदत करेल. याच दृष्टीकोनातून आम्ही महिंद्रा ट्रान्सपोर्ट एक्सलन्स अवॉर्ड्स सुरू केले आहेत. हे पुरस्कार अशा व्यक्तींसाठी आहेत ज्यांनी भारतीय ट्रक उद्योगात परिवर्तन घडवून आणण्यासाठी योगदान दिले आहे आणि त्याद्वारे उत्कृष्ट कामगिरी, सर्वोत्कृष्टता, नाविन्यता आणि परिवर्तनशील नेतृत्व यांचा बहुमान केला जातो. संपूर्ण वर्षभरातील सर्वोत्कृष्टतेचे आणि अद्वितीय कामगिरीचे प्रदर्शन करण्यासाठी असलेले हे एक व्यासपीठ आहे आणि याद्वारे अशी परिमाणे निर्माण केली जातात ज्यामुळे संपूर्ण उद्योगक्षत्राला प्रेरणा मिळेल.
अधिक माहितीसाठी महिंद्रा ट्रांसपोर्ट एक्सलन्स अवॉर्ड्स वेबसाईटला भेट द्या  Mahindra Transport Excellence Awards

6

तरुणांना वाहतूक उद्योगात प्रवेश करण्यासाठी प्रोत्साहन देऊन आणि त्यांना सक्षम करून सकारात्मक बदलाचे एजंट बनविणे हे महिंद्रा ट्रक आणि बसचे उद्दिष्ट आहे.

ही उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी, आम्ही MPOWER नावाचा एका कार्यक्रमावर विचार केला आणि तो तयार केला आहे - तरुण वाहतूक उद्योजकांसाठी व्यवस्थापन विकास कार्यक्रम. त्यांना स्पर्धात्मक उद्योगक्षेत्रात तोंड देण्यासाठी सक्षम करणे आणि त्याचबरोबर सर्वोत्कृष्ट कामगिरी करण्यास तयार करण्यासाठी आम्ही इंडियन इन्स्टिट्ययूट ऑफ मॅनेजमेंट, अहमदाबाद (IIM-A), इंडियन मेरिटाइम युनिव्हर्सिटी (IMU) आणि अनंतरा सोल्युशन्स प्रा. लि. यासारख्या आपआपल्या क्षेत्रात सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या नामांकित संस्थांना नॉलेज पार्टनर बनवले आहे.

5

हा एक सामूहिक शिक्षण कार्यक्रम आहे जो भारतीय ट्रकिंग उद्योगातील मार्गदर्शकांना सक्षम करण्यासाठी तयार करण्यात आला आहे. या व्यासपीठावर, उद्योग क्षेत्रातील दिग्गज इतर फ्लीट ओनर्स, मास्टर प्रोफेशनल्स यांच्यासह वाहतूक या विषयावर त्यांचा दृष्टिकोन काय आहे ते स्पष्ट करतात आणि IIM--A फॅकल्टीशी चर्चा करतात आणि वाहतूकदारांच्या पुढील पिढीला मार्गदर्शन करतात.

4

जोपर्यंत त्याचा प्रत्यक्ष उपयोग केला जात नाही तोर्पंत शिक्षण पूर्ण होत नाही, असे म्हणतात. MPOWER च्या वॉर रुममागेही हाच विचार आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून सहभागींनी त्यांच्या MPOWER शिक्षणाचा कसा उपयोग केला आणि आपल्या कौटुंबिक वाहतूक व्यवसायाचा कसा विकास केला ते सादर करू शकतात. या कार्यक्रमामुळे सहभागींना एकमेकांच्या अनुभवांमधून शिकण्याची आणि अधिक चांगले संबंध निर्माण करण्याची संधी मिळते. IIM·A यांच्या संयुक्त विद्यमाने हे कार्यक्रम आयोजित केले जातात. आतापर्यंत वॉर रूमचे तीन कार्यक्रम झाले असून त्यात सुमारे 66 व्यक्ती सहभागी झाले आहेत.

3

हा एक प्रकारचा आगळावेगळा उपक्रम आहे ज्यात ग्राहकांना महिंद्राच्या अत्याधुनिक चाकण प्लांटला अनोखी भेट देण्याची संधी मिळते. त्यामुळे त्यांना संपूर्ण ट्रक उत्पादन प्रक्रिया, तंत्रज्ञान आणि गुणवत्ता नियंत्रण पाहण्याची संधी मिळते ज्याच्या सहाय्याने महिंद्राच्या ट्रक्सची आणि अद्वितीय कामगिरी करणाऱ्या मशिन्सची निर्मिती केली जाते.

कॉर्पोरेट पत्ता

नोंदणीकृत कार्यालय:

महिंद्रा अँड महिंद्रा लि.

अपोलो बंदर, कुलाबा, मुंबई, महाराष्ट्र 400001.

मुख्यालय

महिंद्रा ट्रक आणि बस विभाग

महिंद्रा टॉवर, 5वा मजला, विंग 4 प्लॉट नं. A/1, चाकण औद्योगिक क्षेत्र फेज IV, पोस्ट – निघोजे चाकण, ता. खेड, जि. - पुणे, महाराष्ट्र. पिन 410 501.

फोन

1800 315 7799 (मिस्ड कॉल)
1800 200 3600 (टोल फ्री)

ईमेल

[email protected]
[email protected]